२५ नोव्हेंबर २०१८

माणुसकीचा रंग


माणुसकीचा रंग

विखुरलेल्या  माणसास,
एकतेची कास हवी.
माणसात माणूस पेरण्यास,
मज तुझी साथ हवी.

आता कोणतेच रंग न सोडले,
याच जातिवंत क्रूर माणसाने,
अनेकांच्या मनी मस्तकी पेरले,
निळे,हिरवे,भगवे,याच माणसाने.

अग सखे आज तू सांग गं ,
माणसास रंग देऊ कोणता!
मी कसं सांगू हो तुम्हाला?
येथे कोणताच रंग उरला !

माणसातल्या जातीच्या भिंतीला,
आता आपणच दोघेच रंगवूया.
सखे,माणसातल्या माणसाला,
आज माणुसकीचा रंग देऊया.
©️®️ कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)
          मो. नं.7391939846

०६ नोव्हेंबर २०१८

तेजोमय



      तेजोमय


पहाटे सगळे साखर झोपेत
गोड स्वप्नात असतांना,
बाप साखर बनविण्यासाठी,
ऊसतोडीला निघायचा.
थोडा उशीर झाला तर,
बाप मध्येच घाई करायचा.

बाप सदा गाडी हाकताना,
बैलाला जोरात पळवायचा
बिचारा बैल ही बापासम,
सारं काही सहन करायचा.

माय करपलेल्या हातांनी,
चुल्हीवर भाकरी भाजायची.
घामासमवेत ऊसा-पाचटामधी,
भाकरीला चव न्यारीच असायची.

'बा'च्या आयुष्यात कसला दसरा,
अन् कसली आली दिवाळी,
आजन्म त्यांच्या नशिबांची रे,
पाटी आजही आहे काळी.

दिवाळीला बाप झोपडी बाहेर पडताना,
त्याला लख- लख प्रकाश दिसायचा.
तेव्हा ते सारं- सारं काही पाहून ,
बापाच्या मनात काळोख दाटायचा.

बापाच्या मनात दाटलेला काळोख,
आता मला नाहीसा करायचाय.
त्यांच्या हृदयात विझलेल्या दिव्याला,
पुन्हा तेजोमय करायचय.

©️®️ कवी: दिनेश राठोड (जिजाईसुत)
             मो नं. 7391939846






१९ ऑक्टोबर २०१८

ऑनलाईन प्रेम आणि जात. (कथा)



ऑनलाईन प्रेम आणि जात
        लेखक: दिनेश राठोड
         मो. नं.7391939846

       दिव्यांश, नेहमीप्रमाणे आजही मोबाईल मध्ये गुंतलेला होता.त्याला एकवेळ जेवण दिलं नाही,तरी चालेल पण मोबाईल मात्र नेहमी हवाच. मोबाईल शिवाय त्याला कधीच करमणार नाही. हे त्याच्या जीवनातील कटू सत्य.दिव्यांश अभ्यासात हुशार, आणि त्यातही तो एक साहित्यिक,लेखक,कवी होता. मोबाईल मध्ये एवढं गुंतण्याच कारण म्हणजे... मोबाईल मध्ये असणाऱ्या सोशल वेबसाईट चा त्याला फार लागावं.तो नेहमी त्याच्या कथा,कविता,लेख, चारोळ्या, फेसबुक व व्हॉटसअप या सारख्या सोशल वेबसाईट टाकून लोकांशी हितगुज करत राहायचं.आपले विचार लोकांपर्यंत पोहचवत राहायचा.
              दिव्यांश आजही नेहमीप्रमाणे एक प्रेम चारोळी फेसबुकवर पोस्ट केली, ती अशी होती...
           " अगं कळतच नाहीय कसे, कुठे,का ?
             पण माझ्या प्रेमाला ही लागलंय ग्रहण.
             माझं प्रेम तुझ्यापर्यंत पोहचलचं नाही,
            अजूनही तो तुझ्यासाठी करतोय भ्रमण"
त्याच्या इतर चारोळी पेक्षा या चारोळी खूप लोकांचा प्रतिसाद मिळाला होता.अनेक लोकांना ही चारोळी आवडत होती.अनेक जण चांगल्या प्रतिक्रियाही देत होते. त्यात ही "काय मस्त लिहितात दिव्यांशजी" अशी एक प्रतिक्रिया होती.ती एका 20 वर्षाच्या मुलीने दिलेली प्रतिक्रिया होती. तिचं नाव होत ' दिव्यांशी. '
नावात फक्त एका वेलांटी चा फरक... बाकी मात्र सेम....दिव्यांश ला ती सहज आवडली. याने तिला मेसेज केलं.." हाय दिव्यांशी"
तिचा ही पलटवार " हाय खुप छान लिहितोस"
            असच बघता बघता एकमेकां ची मैत्री झाली. दिवस रात्र बोलत राहायचे....या मैत्रीचं रूपांतर  पुढे प्रेमात झाले.
यात गंमत अशी होती की,दिव्यांशी ही दिव्यांश पेक्षा एक वर्ष मोठी असते.पण प्रेम हे आंधळ असत,आणि या प्रेमाला वयही नसत.ते अगदी खरं या दोघांच्या जीवनात घडत होत.यांनीही वयाच बंधनं न लावता.त्याने तिला प्रेमाची मागणी केली होती.आणि तिच्याही मनात याच्या बदल प्रेम असल्याने तिनेही होकार दिले. पाण्यामध्ये बर्फाचा तुकडा विरघळाव. तसंच काहीसं ते एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे विरघळले होते.
दिव्यांशी ही एक चांगली साहित्यिका,लेखिका, कवयित्री,होती. दिवस रात्र एकमेकांशी बोलत राहायचे ती त्याला 'पिल्लू' बोलायचं.आणि तो ही तिला '  डार्लींग किंवा बेबी' म्हणायचा.
बोलता बोलता सहज ती त्याला विचारते की, "पिल्लू, खरं सांग तू माझ्यावर किती प्रेम करतोस,
तो म्हणतो की, डार्लींग, आकाशात असणाऱ्या ताऱ्यांचे गणना नसता येत ग करत.आणि हो पडणाऱ्या पावसाच्या थेंब मोजता येतात का? एवढं प्रेम करतो ग..."
अशा वाक्याने,अशा बोलल्याने एकमेकांत पूर्णपणे सामावले होते. असं करता करता दोन महिने उलटले तरी ते  एकमेकांनी कधीच भेटले नाही.दिव्यांश औरंगाबाद ला राहायचा आणि ती पुण्याला... एकमेकांशी फक्त व्हॉटसअप आणि कॉल वर बोलणं. कधी कधी तर व्हिडिओ कॉल वर बोलणं व्हायचं...
असेच दोघांच्या जीवनात सुखाचे दिवस चालू होते. पण सुखाचे दिवस हे जास्त दिवस  टिकत नाही, राहत नाही. असच काहीसं त्यांच्या जीवनात घडायला लागलं होतं.
            दिव्यांशीचे वडील काशिनाथ हे दिव्यांशीच्या लग्नासाठी स्थळ पाहत होते.आता ती वयात आलेली होती.ती 20 वर्षाची झाली  असल्यामुळे तिचं लग्न करणे खूप गरजेचं आहे. असं साहजिकच प्रत्येक प्रत्येक वडिलांना आपल्या मुली वयात आल्यावर त्याच लग्न करणं.हे गरजेचं वाटतं त्यातीलच दिव्यांशीचे वडील होते. जेव्हा जेव्हा मुलगा दिव्यांशी ला घरी पाहायला यायचा... तेव्हा तेव्हा ती लग्नाला विरोध करायची, खुप रडायची, कधी कधी तर जेवणच करायची नाही.आणि दिव्यांश ला फोन करायची आणि रडता रडता नेहमी एकच वाक्य बोलायची," पिल्लू, मला घेऊन जा..... मी तुझ्याशिवाय नाही रे राहू शकणार..... मला तुझ्या शिवाय कोणाचाच स्पर्श नकोय रे...तू जर मला मिळाला नाही तर मी तुझ्या शिवाय जगूच शकणार नाही रे माझा पिल्लू.....
पिल्लू, मला लवकर घेऊन जा रे....पिल्लू.....
असं ती  जेव्हा ती त्याला सांगायची तेव्हा तोही खूप रडायचा...आणि रडत रडतच आपल अश्रू तिला कळू नये म्हणू..तो तिला म्हणायचा की,डार्लींग काही करून 3 वर्ष थांब... मी ही जॉब ला लागेन. आणि मग आपण लग्न करून नेहमी सोबत राहू. दोघे खूप खूप रडायचे... एकमेकांना न कळू देता.. खूप वेळेपर्यंत बोलत राहायचे.
             दोघांनीही ठरवले होते की,आपल्या परिवारांच्या इज्जतीला, प्रतिष्ठेला, काळा डाग न लागू देता आपण आपल्या दोघांच्याही परिवाराच्या संमतीने लग्न करू.
पण दिव्यांशचे वडील हे जातीवादी विचाराचे होते. त्याचा आपल्या जातीवर नितांत प्रेम होते. ते दिव्यांशला नेहमी सांगायचे की,बेटा, कोणत्याही मुलीशी लग्न कर. पण ती आपल्याच जातीची, धर्माची हवी. अशाच मुलीशी लग्न करायचं. मी तुला दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न करू देणारच नाही.जर तू चुकूनही दुसऱ्या जातीच्या मुलीशी मला न सांगता परस्पर लग्न केलं.तर मला तुझं तोंड पण दाखवायचं नाही.आम्ही तुझ्यासाठी कायमचे मेलेलो आहोत. असच समजायचं..ही सिंह वडिलांची सिंह गर्जना नेहमी दिव्यांशच्या कानावर पडायची.
          दिव्यांशी शी लग्न कसं करायचं? हा प्रश्न नेहमी त्याच्या डोक्यात घर करून होता. कारण ती इतर जातीची होती. दोघीही आपल्या परिवारावर खूप नितांत प्रेम करत होते.म्हणून लग्नाचा निर्णय कसा घ्यावा. हे दोघांनाही कळत नव्हते.' इकडे आड, तिकडे विहीर' अशी द्वंद अवस्था त्याची झाली होती. माणसावर जातीने किती घर केले आहे.याच जातीमुळे एकमेकांची जुळलेली मने अनेकदा दुभंगली आहे. याच जातीमुळे माणूस माणसाशी बोलत नाही. असे अनेक अनुभव यांना येत होते. दोघीही साहित्यिक असल्याने दोघांनी जातीवर चारोळी तयार केली.ती अशी,
दिव्यांशची चारोळी––
       " एकमेकांवर चिरकाल प्रेम करणारी,
         मनात खूप प्रेम असूनही हल्ली पाखरेही,
        बघा ना जातीमुळे च आपल्या प्रेमाला,
        कसं निःस्वार्थ पणे दुरूनच पाहू लागली."
आणि दिव्यांशीची चारोळी––
                   "प्रेमाचे अतूट नाते
           आज जातीमुळे च विस्कटले आहे.
                     भविष्यात प्रेमामुळे
              जायचं श्रेष्ठ ठरणार आहे."
          
           सकाळची दुपार,दुपारची संध्याकाळ, आणि नंतर रात्र , पुन्हा तीच सकाळ अस सर्वांसारखे चक्र त्याच्याही जीवनात फिरत होते.पण या चक्रात च एक चक्रव्यूह होत.ते म्हणजे त्याचं लग्न.
     एकदा तिने दिव्यांश ला लेटर लिहिलं खालील प्रमाणे...
दिव्यांश,

पिल्लू,
अजुन आठवतो तो पहिला दिवस ज्या दिवशी तू मला प्रथम प्रेमाची मागणी केली होती.त्या वेळी माझी गत अगदी 'काय सांगू,कस सांगू? संत्र्यासारख्या गोड आंबट सारखी झाली होती.
तू माझ्या आयुष्यात आलास,तेव्हापासून माझ्या जीवनाला एक वेगळं वळण लागल.कळलच नाही,की मी केव्हा प्रेमात पडले.मी प्रथम तुला होकार दिला,तेव्हाही मला वाटतं नव्हतं,की मी प्रेमात पडले आहे. या २१ ऑगस्टला आपल्या प्रेमाला सुरुवात झाली.व आज दोन महीने पूर्ण झाली.पण अजूनही या दोन महिण्यात बरच काही घडून गेलं.थोड़ रुसणं,थोड़सं हसणं...तरी आपल्यातील प्रेम कमी ना व्हायचे.आपण एकमेकांना परस्पर भेटलो नाही,फक्त व्हाट्सअपच्या माध्यमातून आपण प्रेमात पडलो आहे.
तू म्हणायचा ना,आपले प्रेम सर्वात वेगळे आहे.माझ्या प्रेमाचं गुपित मी मनातच ठेवलं.पण तुझी माझी अजूनही दर्शन झालेले नाही.व तुझ्यापर्यत पोहोचण अशक्य होत.स्वप्नात तुला रोज शोधत असे.माझा स्वतावर ताबाच नसायचा त्यामुळे फ़ोटो समोर नकळत किती आणि काय शेयर केलं मी,काय सांगू? तुझ्या येण्याने सगळ जीवन माझे रंगीन झाले आहे.
तुझ्या प्रेमाने मला जगण्याची नवी दिशा मिळाली. असं म्हणतात ना, की प्रेम कधी सुखासुखी मिळत नाही. हे खरं आहे. अपेक्षेप्रमाणे तुझ्या घरच्यांकडून विरोध होणार, हे मला माहीत होतं. कारण मी तुझ्या समाजाची नाही आणि समाज जातच बघतो,अश्याने नावाची बदनामी होते,पण आपले प्रेम हे माणुसकीला एक वळणं देणारे आहे.पण प्रेम ठरवून तर होत नाही ना! शेवटी ते तुझे आईवडील. त्यांच्या भावना मी समजू शकते. पण मी? माझ्या भावना? त्यांचं काहीच मोल नाही? मी तुझ्यावर निस्वाथीर् प्रेम केलं. माझं आयुष्य तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यात संपतं.
          माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर. देव आपल्याला कधीच वेगळं नाही करणार. कारण या प्रेमाचा धागा त्यानेच बांधलाय. या दोन महिन्यात मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. आज एकच मागणं आहे. तू आपलं प्रेम घरच्यांसमोर उघड कर. प्रेमासाठी तू फक्त एक पाऊल उचल. तुझ्यासाठी मी सर्व आयुष्य देईन. तुझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटांना तुझ्याआधी समोरी जाईन.आज मी तुझी वाट बघतेय. तू कधी पुढाकार घेशील?
Your loving
दिव्यांशी...
           आता दोघांनी ठरवलं होत की,आपण खूप खूप शिकायचं आणि चांगल्या जॉब ला लागायचं. तरच आपल लग्न होण्यास थोडी मदत होईल. घरचे पण सहमती दर्शवतील आणि परिवारासोबत राहता येईल. अशा विचाराने दोघेही खूप अभ्यास करू लागली. असे काही दिवस चागले जातात."सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे. या म्हणी प्रमाणे जणू त्याच्या जीवनातील सुख संपायला आले होते.  दिव्यांशीचे वडील पुन्हा तिच्या साठी स्थळ पाहू लागले होते.एक चांगले स्थळ आले होते. मुलगा शिक्षक होता. दिसायला ही छान होता.तिला पाहायला पाच लोक सुखाने येत होती. पण घराच्या एका कोपऱ्यात अश्रु मार्फत गंगेचा उगम होत होता.तिला न विचारताच तीच लग्न ठरवलं जातं. लग्नाचे दिवस जवळ जवळ येत असतात...दिव्यशी अबोल होते. घरात नि दारात कोणाशीच बोलत नाही. दिवसेंदिवस आजारी पडत चालली होती.दिव्यांश ला फोन करते खूप वेळ वेडी सारखी बोलत राहायची. तो ही खूप रडायचा.. जिच्यासाठी एवढे प्रयत्न करत आहे. ती मला मिळणार नाही, माझी दिव्यांशी मला मिळणार नाही, माझं प्रेम मला मिळणार नाही, माझं प्रेम अपूर्णच राहिलं. या विचाराने तो ही खूप रडायचा. आणि रडत रडतच तिला समजावतो,"जे घडलंय ते स्वीकार कर, कदाचित तू माझ्या नशिबात नाहीय. किंवा मी तुझ्या नशिबात नसेल. तू तुझ्या आईबाबांच्या इज्जतीचा, प्रतिष्ठेचा विचार कर आणि करून घे ग लग्न....
दिव्यांश मनातलं हुंदका, मनातच दाबून सांगत असतो. ती खूप रडते हा पण रात्रभर झोपतच नाही, मनात तिचाच करत राहतो...
पिल्लू, मला घेऊन जा..... मी तुझ्याशिवाय नाही रे राहू शकणार..... मला तुझ्या शिवाय कोणाचाच स्पर्श नकोय रे...तू जर मला मिळाला नाही तर मी तुझ्या शिवाय जगूच शकणार नाही रे माझा पिल्लू.....
पिल्लू, मला लवकर घेऊन जा रे....पिल्लू..... हे शब्द रात्रंदिवस त्याच्या मनातच घर करत होते. त्याला झोपू देत नव्हते, जगू देत नव्हते......
दोघांनाही नकोसा असणारा काळोख मय दिवस उजाडतो. तिची हळद असते. सर्व जण सुखाच्या सागरात बुडालेले असतात.पण दुःखाच्या लाटेशी ती एकटी सामना करत होती याच दिवशी ती दिव्यांश ला खूप मोठा संदेश पाठवते... जणू जुन्या काळातल प्रेम पत्रच...
माझा पिल्लू,
शोना,
   आज हा संदेश वाचताना तुझ्या डोळ्यातून अश्रूं च्या धारा वाहतील.पण तुला ते वाहू द्यायचं नाहीय. कारण तू रडलास तर मी ही रडते,हे तुला माहित आहे.आपण एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो.आणि लग्न करण्याचं ही स्वप्न आपण उराशी बाळगल होत. त्यासाठी नको नको ते अनेक प्रयत्न ही आपने केले. एकमेकांच्या बोलल्याशिवाय आपण थोडाही वेळ राहू शकत नव्हतो. बोलल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नव्हती. मी तुला रात्री 3 वाजता अभ्यासाला उठवायची पण आता सवय करू न घे... रोज सकाळी उठत जा.. कारण तुला उठवायला आता मी तुझ्याजवळ नाहीय रे,मला सोडून राहण्याची सवय पाडून घे रे... माझं लग्न जरी झालं तरी आपण जवळ राहू शकतो. आणि भविष्यात याच नीच्च समाजाला आपण "प्रेम हे जातीपेक्षा पवित्र नातं आहे हे सांगू शकतो." त्यासाठी तुला माझ थोड ऐकावं लागेल. ऐकशील ना... माझं लग्न झाल्यावर मला जे मुल होईल ना. त्याच नाव दिपाली व दिपक ठेवूया. तू पण तुझ्या मुलांचं हे नाव ठेवशील... ठेवशील ना पिल्लू...
     माझा मुलगा आणि तुझी मुलगी, किंवा तुझा मुलगा आणि माझी मुलगी यांचं आपण लग्न करू या नात्याने तरी आपण एका विशिष्ट नात्याने का होईना बांधले जाऊ. आणि या समाजाला ही कळेल की, आपली जात च आपल श्रेष्ठत्व नसत. त्याही पलीकडे माणुसकी असते, प्रेम असत... हे सगळ तूही करशील ना रे मान्य..पिल्लू सांग ना...तुला आहे का हे मान्य...
तुझीच असून तुझी नसणारी...
दिव्यांशी...
            त्यालाही  या सगळ्या गोष्टी मान्य असतात. तो होकरही देतो.
             तिचं लग्न होत तो सासरी जाते,दिव्यांश चा विचार नेहमी त्याच्या डोक्यात घर करून होता... . तो कसा असेन? काय करत असेल? त्याच लग्न, तिची बायको त्याला खुश ठेवत असेन का?त्याच्याबद्दल असे अनेक प्रश्न त्याच्या मनात पडायची. काही दिवसाने  दिव्यांशी ला मुलगा होतो. थोडासाही विचार न करता  त्याच नाव ती "दीपक" ठेवते. आणि इकडे दिव्यांश ला मुलगी होते. तोही तिने सांगितल्या नुसार मुलीची नाव "दिपाली" ठेवतो. दोघांचेही मुलं दिवसेंदिवस मोठी होत असतात. दोघे ही नोकरी ला असतात. दोघांनाही वाटत की आता वेळ आली आहे,आपण ठरवलेल्या  आणि दिलेल्या वचनानुसार दोघांचं लग्न करण. आणि या जातीवादी लोकांना आणि या निच समाजाला जातीतून  बाहेर पडण्यासाठी शिकवण देणं. जात ही देवाने नव्हे तर आपणच तयार केली आहे. कोणत्याही जातीचे लोक हे वेगळे नसतात. सर्वांचं रक्त हे लालच असत.या जातीयतेच ला लाथ मारण्याची,आणि आपण लग्न नाही करू शकलो याच जातीमुळे,पण आज याच जाती विरुद्ध आपणच आपल्या मुलाचं लग्न करून समाजला बेधडक धडा शिकवू..या जाती रुपी अंधाऱ्या अमावस्येच्या रात्री त निद्रिस्त झालेल्यांना जागे करण्याची वेळ आता आलीय...
आपण ही आता एका नात्यात गुंफले जाऊ, बांधले जाऊ..
     दिपाली आणि दीपक या दोघांचं ही लग्न लागत.दिव्यांशी व दिव्यांश हे ही एका नात्यात बांधले जातात आणि जातीवादी लोकांना, जात च आपला श्रेष्ठत्व समजणाऱ्या, पंगू लोकांनाही याची शिकवणं मिळाली...
            मित्रहो, एका विशिष्ट जातीच नका अडकून बसू, कोणतीच जात देवाने तयार केलेली नाहीय. हे सगळे आपण च निर्माण केलेला कचरा आहे. आणि याला साफ ही आपणच करू शकतो. याच जाती मुळे नको नको ती हानी झाली. आता पुढील भविष्य आपल्या हातात आहे. आपण जर अजूनही जातच श्रेष्ठ समजू लागलो ना तर माणसं उरणार नाही या भूतलावर,नाही तर कदाचित माणसं राहतील पण माणसातली माणुसकी मात्र राहणार नाही हे ही तितकंच खरे आहे हे जग पाषाण सम असंवेदशील होईल...
   चला तर मग दिव्यांशी व दिव्यांश सारखे आपण ही या जातीवादातून मुक्त होऊया. माणसाला माणुसकी चा मंत्र देऊया. एकतेने राहू या...
:::::::::::::::::::::::::: समाप्त:::::::::::::::::::::::
लेखक: दिनेश राठोड (जिजाईसुत)
चाळीसगाव (जळगाव)
मो. नं.7391939846



०६ ऑक्टोबर २०१८

म्हातारपण


म्हातारपण
""""""""""""""'"""'"'"'
आयुष्याची खरी यातना
असह्य जगण्याच्या वेदना.
आठवतंय ते  बालपण ,
नकोय वाटतं हे म्हातारपण.

बोट धरून ज्यांना,
चालायला शिकवलं.
त्यांनीच अर्ध्या वाटेवरी,
बोट सोडूनी दिलं.

वाटेवरच्या वाटसरूचीही,
अशीच काहीशी कथा.
राहून ,. न  राहूनही,
वर्णवू लागले आपली व्यथा.

वाटेवरच्या चिमण्यांची ,
तीच चिव- चिव किलबिलाट.
पुन्हा पुन्हा सांगू लागले मज,
अरे! तुझा कोणी नाही या जगात.

त्या वाटेवरी रडलो- पडलो,
अन् पुन्हा स्वतः ला सावरलो.
आता असह्य वाटतंय हे जीवन,
देवा! आयुष्यात नको रे हे म्हातारपण.

©️कवी: दिनेश राठोड (जिजाईसुत)
मो.ना .7391939846


१० सप्टेंबर २०१८

अलविदा


""अलविदा ""
""""""""""""""""""""""""
कोमेजलेल्या कळीसम,
मित्रांनी दिले निरोप मला.
मी ही स्तब्ध पाषाणसम,
बोललो,तुम्हालाही अलविदा.....

मैत्रीची रेशीम गाठ तुटली,
शाळेचे दिवस संपता .
हिच का निसर्गाची किमया !
ते म्हणाले,तुला अलविदा.....

रोखूनी हदयाचा ठोका,
मुखातून शब्द फुटेना.
तरी मित्र म्हणाले पुन्हा,
तुला आमचा अलविदा.....

माझे जीवन तेजोमय झाले,
तुमची साथ लाभता .
अश्रू लपवत सहज म्हणाले,
तुला आमचा अलविदा.....

बंद करुनी स्पंदने ,
मैत्रीचा डाव मोडणे.
सोपं नसतं प्रमेश्वरा.....
एकमेकांस देणे अलविदा....


©️कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)

०३ सप्टेंबर २०१८

माझा अंत


पुढच्या जन्मी


 पुढच्या जन्मी
"""""""'""""'"""""""""""
तुझ्याशी   बोलाया,
आलो तुझ्या जवळी.
बोललो मी तुझ्याशी,
उमलली मनातली कळी.

सांग   प्रिये सांग ना ,
जोडशील का नाती.
करशील का प्रेम माझ्याशी,
करतो मागणी प्रेमाची.

या पाषाणाला दे,
तू गं उत्तर.....
जगी पसरू दे,
आपल्या प्रेमाचं अत्तर.

तू काय उत्तर द्यावं !
अन् मी मुक्काच व्हावं.
या प्रेमाचं वाजेल का शंख?
या प्रेमाला फुटेल का पंख?

सांग ना पुढच्या जन्मी तरी,
प्रेमाला देशील का आकार.
प्रेम करशील का साकार.
निदान, पुढच्या जन्मी तरी.....


कवी: दिनेश राठोड (जिजाईसुत)

०२ सप्टेंबर २०१८

शाळेत आपण जाऊ या


शाळेत आपण जाऊ या!
""""""""""""""""""""""""
शाळा शिकायला या रे या!
सुंदर आहे , ही शाळा....//धृ//

या सगळे सर...सर...सर.....
शिकवा आम्हाला भर...भर...
आनंदाने शिकू या.....
शाळेत आपण जाऊ या...//१//

गुरुजींची कविता गाऊ या...
आनंदाने डोलू या......
गुरुजींची आज्ञा पाळू या...
शाळेत आपण जाऊ या.....//२//

शाळेत झाडे लावू या...
निसर्ग आपण फुळवूया...
विचार चांगले करू या...
शाळेत आपण जाऊ या...//३//

शिकून मोठे होऊ या...
ज्ञान आपले वाढवूया...
चांगले जीवन जगू या...
शाळेत आपण जाऊ या...//४//

कवी: दिनेश राठोड (जिजाईसुत)
चाळीसगाव (जळगांव)
मो नं.7391939846

३१ ऑगस्ट २०१८

गझल

✍️✍️ गझल ✍️✍️

हारलो कुठे, मग जिंकलो कुठे मी,
थांब आयुष्या! अजून लढत आहे.

आज  जिवंत,  उद्या  कोण पहिला,
म्हणून आज थोडा जगून घेत आहे.

मजसवे  खेळण्यासम  खेळली  ती,
तिचा आज थोडा हिशोब घेत आहे.

नानापरी चे  रे  व्यसन  करतांना,
त्यांना मरताना आज पाहत आहे.

लोक उठले आज त्यास जाळावया,
संविधाना आज थोडा बोलत आहे.

©️कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)
मो. नं.7391939846

२५ ऑगस्ट २०१८

रक्षाबंधन....

एक वर्षा पूर्वीचा लेख...
                दिव्य मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झालेला....
 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

२४ ऑगस्ट २०१८

निरोप


    निरोप
""'"""""""""""""""""""""""""'""_
पक्ष्यांना फुटतात पंख, जातात ती उडून,
का कसे कोण जाणे, मी जातो खचून.

तुमच्यासंग जगलो,खेळलो अन् बागडलोही.
पण तुमचे प्रेम मी , मी कधीच विसरलो नाही.

कटू शब्द बोललो , असेन मी कधी.
पण खरच प्रेमाचा ओलावा मनामधी.

जेव्हा कधी गुरफटेल मी, दु:खाच्या जाळ्यात.
तेव्हा येईल तुमचीच , आठवणं मनात.

आता असच नुसतं,कण्हत-कण्हत जगायचं.
जीवनातल्या आठवणी आता, स्वप्नातच पाहायचं.

आता द्यावा निरोप मजला हसून.
त्या हास्याने माझे जीवन जाईल फुलून.

©️कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)

२१ ऑगस्ट २०१८

आस

१३. आस....
""""""""""""""""""""
हवी  मज  जगण्यास,
थोडी मोकळीक जागा.
नको बंधनाचा भास,
नका अश्र्लिषेने वागा.

नका देऊ रे वेदना,
जागवा रे संवेदना.
आहे रे मी कणखर,
नका मोडू माझा कणा.

केले रे तुम्ही घायाळ,
मज बंधन लादून.
आता थोडे द्या बळ,
जगी जाईन उडून.

निखाऱ्याचे चटके रे,
आयुष्यभर सोसले.
सरणावर तरी रे,
नका देऊ रे चटके.

एक आर्जवते तुम्हा,
नका दाबू माझा श्वास.
मनी आहे अजूनही,
मज जगण्याची आस.

© कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)

१५ ऑगस्ट २०१८

माय


"""" माय """
"""""""""""""""""""""""
तुझं अवघं सागर,
मी मागत नाहीय.
सागर कवेत घेण्याइंतकं पाणीही,
मी मागत नाहीय.

आईचा शोध घेईपर्यंत,
ह्या हातांना प्रयत्न दे !
         आणि
प्रयत्न करायला ह्या मेंदूला,
देता आलं तर बुध्दी दे !
         आणि
प्रेम घ्यायला ह्या हृदयाला,
देता आलं तर माय दे !
बसं, इंतकं दान दे !

कवी:दिनेश राठोड(जिजाईसुत)
मो. नं.7391939846

१३ ऑगस्ट २०१८

जगाचं चित्र


८. जगाचं चित्र
""""""""""""""""""""""""
एकदा जगाचं चित्र काढताना,
त्यात रेखाटलं,
मनमोहक हिरवा निसर्ग,
अन् भक्कास दिसणारा वाळवंट.

पशु पक्षी ही दाखवले,
तुटक - मुटक दोन- तीन,
कारण, मला खोटं चित्र नव्हतं काढायचं,
मांडायच होत भयाण वास्तव,
पारदर्शी........

रस्ता तसा अरुंद दाखवलं,
पण, रस्त्यावर वासनेने भरलेल्या नजरा,
अन् उमलत्या खुरडणाऱ्या कळ्या,
जीवनाचं गाठोडं सुरळीतपणे चालवण्याकरीता,
देह विक्री करणाऱ्या आया -  बाया..
न जमले दाखवता- रेखाटता.....

रेखाटले सेलिब्रिटी चे ही  चेहरे,
नव्हे नव्हे तर त्यांच्या बालकांचे सुद्धा.
पण कुपोषणाने आजन्म मरणारे,
बालकांचे चित्र ही....
न जमले दाखवता- रेखाटता.....

भ्रषटाचारात मळलेले हात, दर्शविताना,
पेन्सिल सहज फिरवली,
पण सामान्य माणूस आजही,
पृथ्वीभोवती गोलच फिरतोय अजूनही...
हे दर्शवायच राहूनच गेलं,
ती प प्रत्येकाची सवयच आहे म्हणा.

चित्र तसा खूपच सुंदर दिसत होता.
लाखोत पेंटिग विकली गेली.
पान भरेपर्यंत दाखवली,
माणसांची गर्दी.......
पण माणसातली माणुसकी,
काही दिसलीच नाही.

आजतागायत खोटा पसारा,
खुप किमतीत विकल्या,
वास्तव मात्र आजही, अजुनही...
कवडीमोल आहे ...
अजाण आहोत....
माणसातल्या माणूसकीप्रमाणे.....


कवी: दिनेश राठोड

आयुष्याचं चित्रं...


  "आयुष्याचं चित्र "
""""""""""""""""""""""""""""""""
बाप मुलाचं आयुष्याचं चित्र रंगवतांना,
स्वत:च चित्र मात्र,न रंगवलेलं,बिनरंगी !
जीर्ण झालेल्या निराधार व्रृक्षासम !

मुलाला लहानाचं मोठं करणं,
पालणं हलवता-हलवता वाढवणं अन शिकवणं,
शिकवता-शिकवता नोकरीच्या उंबरठयावर पोहचवणं!

मुलगा होतो मोठा,साहेब,अधिकारी,
मग झोपडीचं रुपांतर घेतात इमारती !
त्यात त्याचं मुलबाळ अन त्याची साथी !

शेवटी बापाला कष्टाचं मोबदला मिळतं काय !
इमारतीत न राहण्याचा अधिकार !
अन अंती व्रृध्दाश्रम हेच मग आधार!

 कवी: दिनेश राठोड

१२ ऑगस्ट २०१८

घर सोडतांना...


    घर सोडतांना...
"""""""""""""""""""""""""""
आई,  मी घर सोड़तानां,
तुझ्या डोळ्यातून पाणी निघायचं.
अन् बाबांच्या डोळ्यात तर,
जणू महासागर साठलेलं दिसायचं.

मला आठवतंय मी पाया पडताना,
तू माझ्या डोक्यावर हात ठेवायची.
खुप शिक मोठा साहेब बन,
असं तू डोळ्यातून मला सांगायची.

बाबाच्या डोळ्यातलं महासागर,
अन् आई तुझाही तो मायेचा पदर.
नकळत माझ्या मनात साठायच,
एकांतक्षणी माझंही मन खूप रडायचं.

मला पण आठवायच मग,
बाबांच्या डोळ्यातले पाणी,
उन्हा- तान्हात राबण्याची,
तुमची दर्दमय जीवन कहाणी.

आठवून आठवून मला पण,
शिकण्याची स्फूर्ती मिळायची.
पुस्तकामधल्या प्रत्येक चित्रात,
आई तुच मला दिसायची.

कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)

११ ऑगस्ट २०१८

मास्तर


""""" मास्तर """"""
"""""""'"'"""""""""""""""""""""
मास्तर,
तुमचा काळा फळा केव्हाच गेला हो.......
आता पांढरा आलायं पांढरा.....
आणि पोरांच्या आयुष्यात ,
या पांढऱ्या रंगानी "काळ" आणलयं,
बघा काळ...मास्तर....काळ......

या अवास्तवीं,आभासी दुनियेचा,
जाणं नाही करून दिलीत म्हणून.....
मास्तर,आजचं पोरगं बघा.......
गुंडगिरी,दहशतवादी,गुन्हेगारी,
नव्हे नव्हे तर बलात्कारी सुद्धा,
बनायला लागलीयं मास्तर.......
याला जबाबदार पोरगं नाही मास्तर,
तुम्हीच आहात...हो तुम्हीच.......

मी पंतप्रधान,राष्ट्रपती,
आणि धनपती झालो तर....!
अशा काल्पनिक जगात नका जगवू,
वास्तवांशी नाळ जुळवा मास्तर.....

कारण,आज आमचं पोरगं,
१००%गुण मिळवून ही.....
सुशिक्षित बेरोजगार झालाय मास्तर.....
म्हणून सांगावसं वाटतं मास्तर,
"आजच्या पोरांना माणसांवर नाही.
माणसातलं शिकवा मास्तर.....
माणसातलं".......

केवळ कागदी परीक्षेत,
पास होण्याकरिता नाही,
"जीवनाच्या परिक्षेत"
पास झाला पाहिजे मास्तर......
" जीवनाच्या परिक्षेत"......

कवी: दिनेश जवरीलाल राठोड (जिजाईसुत)
मो. नं.7391939846

चारोळ्या... प्रेमाच्या...





चारोळ्या मनातल्या.....






आठवण


      आठवण ....
"""""""""""'"""""""""""
भावना माझ्या मनातल्या,
तुला  कसे कळले  नाही.
सागराच्या  मिलनासाठी,
सरिता का  वाहत राही?

साद   देत  हृदयाला,
तू मिचकावलेस डोळा.
तुला दिलेल्या प्रेमपत्राचा,
केलेस तू चोळामोळा.

तुटलेल्या चांदण्याकडून,
मी तुला मागितलं होतं.
पण त्या बिचाऱ्यालाही,
चांदणीसमोर झुरायचं होतं.

भावना माझ्या हृदयाच्या,
नच जमले तुला सांगता.
खरंच कधीच न जमले,
प्रेम चित्रात रंग भरता.

प्रेमाच्या  या  समुद्रात ,
कधी न जमले मला पोहता.
येते आता तुझी आठवण,
तू दिलेल्या भेटवस्तू बघता.

****-- कवी दिनेश राठोड --****
  मो. नं. 7391939846

बालपण


     बालपण
"""""""""""""""""""""
नसे सदा जीवाला कष्ट,
आनंदाच्या लहरी फक्त.
नाही मनाला कोंदण.
असे होते ते बालपण.

होतो जेव्हा मी तान्हा ,
माय पाझरे अमृताचा पान्हा.
त्या अमृताची लागते तहान,
असे होते ते बालपण.

पुरले ते चित्र बालपणाचे,
अन् संपले दिवस लाढाचे.
राहिल्या केवळ आठवण,
असे होते ते बालपण.

नव्हते कशाचे बंधन,
मनसोक्त ते जीवन.
देवा! एकच दे वरदान,
मिळो पुन्हा ते बालपण.

कवी दिनेश राठोड

म्हातारपण


 म्हातारपण
""""""""""""""'"""'"'"'
आयुष्याची खरी यातना
असह्य जगण्याच्या वेदना.
आठवतंय ते  बालपण ,
नकोय वाटतं हे म्हातारपण.

बोट धरून ज्यांना,
चालायला शिकवलं.
त्यांनीच अर्ध्या वाटेवरी,
बोट सोडूनी दिलं.

वाटेवरच्या वाटसरूचीही,
अशीच काहीशी कथा.
राहून ,. न  राहूनही,
वर्णवू लागले आपली व्यथा.

वाटेवरच्या चिमण्यांची ,
तीच चिव- चिव किलबिलाट.
पुन्हा पुन्हा सांगू लागले मज,
अरे! तुझा कोणी नाही या जगात.

त्या वाटेवरी रडलो- पडलो,
अन् पुन्हा स्वतः ला सावरलो.
आता असह्य वाटतंय हे जीवन,
देवा! आयुष्यात नको रे हे म्हातारपण.

कवी दिनेश राठोड

पुतळा कविता

११. पुतळा
""""""""""""""""""""'
माझ्या 'बा' ने घामाचे पाणी केले.
भुईच्या कुशीत बि- बियाणे पेरले.
मेघराजाही बरसला सरीवर सरी,
रान हिरवेगार झाले शेता शिवारी.

माय आणे रानात चटणी भाकर,
भाकरीवर लावी आंब्याचा खार.
पोरं फिरती रानोरानी उडती पाखरं,
चाले असा आमचा गरिबीचा संसार.

शेतात  राबता  राबता,
सरली  आमची  हयात.
अंत  नको पाहू  देवा  !
दे रे आमच्या उमिदीला साथ

गरिबीचे भेग नशिबी आले.
जगणं आमच कष्टात च गेले.
किती सोसू चटके, दुःखाच्या झळा,
सुख नाही नशिबी, भेगाळली धरा.

भेगळलेल्या  मातीमधी,
"बा" नं घामाच पाणी झिरपल.
एवढं समदं करुनी शेवटी,
माझं "बा" च सपान हरपलं.



शेतामधल्या   झाडावरी,
दुरूनच एक पुतळा हसला.
जवळ येऊनी  बघतो तर,
माझा"बा" फासात दिसला.

कवी जिजाईसुत