१२ ऑगस्ट २०१८

घर सोडतांना...


    घर सोडतांना...
"""""""""""""""""""""""""""
आई,  मी घर सोड़तानां,
तुझ्या डोळ्यातून पाणी निघायचं.
अन् बाबांच्या डोळ्यात तर,
जणू महासागर साठलेलं दिसायचं.

मला आठवतंय मी पाया पडताना,
तू माझ्या डोक्यावर हात ठेवायची.
खुप शिक मोठा साहेब बन,
असं तू डोळ्यातून मला सांगायची.

बाबाच्या डोळ्यातलं महासागर,
अन् आई तुझाही तो मायेचा पदर.
नकळत माझ्या मनात साठायच,
एकांतक्षणी माझंही मन खूप रडायचं.

मला पण आठवायच मग,
बाबांच्या डोळ्यातले पाणी,
उन्हा- तान्हात राबण्याची,
तुमची दर्दमय जीवन कहाणी.

आठवून आठवून मला पण,
शिकण्याची स्फूर्ती मिळायची.
पुस्तकामधल्या प्रत्येक चित्रात,
आई तुच मला दिसायची.

कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: