१३ ऑगस्ट २०१८

जगाचं चित्र


८. जगाचं चित्र
""""""""""""""""""""""""
एकदा जगाचं चित्र काढताना,
त्यात रेखाटलं,
मनमोहक हिरवा निसर्ग,
अन् भक्कास दिसणारा वाळवंट.

पशु पक्षी ही दाखवले,
तुटक - मुटक दोन- तीन,
कारण, मला खोटं चित्र नव्हतं काढायचं,
मांडायच होत भयाण वास्तव,
पारदर्शी........

रस्ता तसा अरुंद दाखवलं,
पण, रस्त्यावर वासनेने भरलेल्या नजरा,
अन् उमलत्या खुरडणाऱ्या कळ्या,
जीवनाचं गाठोडं सुरळीतपणे चालवण्याकरीता,
देह विक्री करणाऱ्या आया -  बाया..
न जमले दाखवता- रेखाटता.....

रेखाटले सेलिब्रिटी चे ही  चेहरे,
नव्हे नव्हे तर त्यांच्या बालकांचे सुद्धा.
पण कुपोषणाने आजन्म मरणारे,
बालकांचे चित्र ही....
न जमले दाखवता- रेखाटता.....

भ्रषटाचारात मळलेले हात, दर्शविताना,
पेन्सिल सहज फिरवली,
पण सामान्य माणूस आजही,
पृथ्वीभोवती गोलच फिरतोय अजूनही...
हे दर्शवायच राहूनच गेलं,
ती प प्रत्येकाची सवयच आहे म्हणा.

चित्र तसा खूपच सुंदर दिसत होता.
लाखोत पेंटिग विकली गेली.
पान भरेपर्यंत दाखवली,
माणसांची गर्दी.......
पण माणसातली माणुसकी,
काही दिसलीच नाही.

आजतागायत खोटा पसारा,
खुप किमतीत विकल्या,
वास्तव मात्र आजही, अजुनही...
कवडीमोल आहे ...
अजाण आहोत....
माणसातल्या माणूसकीप्रमाणे.....


कवी: दिनेश राठोड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: