आठवण ....
"""""""""""'"""""""""""
भावना माझ्या मनातल्या,
तुला कसे कळले नाही.
सागराच्या मिलनासाठी,
सरिता का वाहत राही?
"""""""""""'"""""""""""
भावना माझ्या मनातल्या,
तुला कसे कळले नाही.
सागराच्या मिलनासाठी,
सरिता का वाहत राही?
साद देत हृदयाला,
तू मिचकावलेस डोळा.
तुला दिलेल्या प्रेमपत्राचा,
केलेस तू चोळामोळा.
तू मिचकावलेस डोळा.
तुला दिलेल्या प्रेमपत्राचा,
केलेस तू चोळामोळा.
तुटलेल्या चांदण्याकडून,
मी तुला मागितलं होतं.
पण त्या बिचाऱ्यालाही,
चांदणीसमोर झुरायचं होतं.
मी तुला मागितलं होतं.
पण त्या बिचाऱ्यालाही,
चांदणीसमोर झुरायचं होतं.
भावना माझ्या हृदयाच्या,
नच जमले तुला सांगता.
खरंच कधीच न जमले,
प्रेम चित्रात रंग भरता.
नच जमले तुला सांगता.
खरंच कधीच न जमले,
प्रेम चित्रात रंग भरता.
प्रेमाच्या या समुद्रात ,
कधी न जमले मला पोहता.
येते आता तुझी आठवण,
तू दिलेल्या भेटवस्तू बघता.
कधी न जमले मला पोहता.
येते आता तुझी आठवण,
तू दिलेल्या भेटवस्तू बघता.
****-- कवी दिनेश राठोड --****
मो. नं. 7391939846
मो. नं. 7391939846
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा