३१ ऑगस्ट २०१८

गझल

✍️✍️ गझल ✍️✍️

हारलो कुठे, मग जिंकलो कुठे मी,
थांब आयुष्या! अजून लढत आहे.

आज  जिवंत,  उद्या  कोण पहिला,
म्हणून आज थोडा जगून घेत आहे.

मजसवे  खेळण्यासम  खेळली  ती,
तिचा आज थोडा हिशोब घेत आहे.

नानापरी चे  रे  व्यसन  करतांना,
त्यांना मरताना आज पाहत आहे.

लोक उठले आज त्यास जाळावया,
संविधाना आज थोडा बोलत आहे.

©️कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)
मो. नं.7391939846

२५ ऑगस्ट २०१८

रक्षाबंधन....

एक वर्षा पूर्वीचा लेख...
                दिव्य मराठी वृत्तपत्रात प्रकाशित झालेला....
 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

२४ ऑगस्ट २०१८

निरोप


    निरोप
""'"""""""""""""""""""""""""'""_
पक्ष्यांना फुटतात पंख, जातात ती उडून,
का कसे कोण जाणे, मी जातो खचून.

तुमच्यासंग जगलो,खेळलो अन् बागडलोही.
पण तुमचे प्रेम मी , मी कधीच विसरलो नाही.

कटू शब्द बोललो , असेन मी कधी.
पण खरच प्रेमाचा ओलावा मनामधी.

जेव्हा कधी गुरफटेल मी, दु:खाच्या जाळ्यात.
तेव्हा येईल तुमचीच , आठवणं मनात.

आता असच नुसतं,कण्हत-कण्हत जगायचं.
जीवनातल्या आठवणी आता, स्वप्नातच पाहायचं.

आता द्यावा निरोप मजला हसून.
त्या हास्याने माझे जीवन जाईल फुलून.

©️कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)

२१ ऑगस्ट २०१८

आस

१३. आस....
""""""""""""""""""""
हवी  मज  जगण्यास,
थोडी मोकळीक जागा.
नको बंधनाचा भास,
नका अश्र्लिषेने वागा.

नका देऊ रे वेदना,
जागवा रे संवेदना.
आहे रे मी कणखर,
नका मोडू माझा कणा.

केले रे तुम्ही घायाळ,
मज बंधन लादून.
आता थोडे द्या बळ,
जगी जाईन उडून.

निखाऱ्याचे चटके रे,
आयुष्यभर सोसले.
सरणावर तरी रे,
नका देऊ रे चटके.

एक आर्जवते तुम्हा,
नका दाबू माझा श्वास.
मनी आहे अजूनही,
मज जगण्याची आस.

© कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)

१५ ऑगस्ट २०१८

माय


"""" माय """
"""""""""""""""""""""""
तुझं अवघं सागर,
मी मागत नाहीय.
सागर कवेत घेण्याइंतकं पाणीही,
मी मागत नाहीय.

आईचा शोध घेईपर्यंत,
ह्या हातांना प्रयत्न दे !
         आणि
प्रयत्न करायला ह्या मेंदूला,
देता आलं तर बुध्दी दे !
         आणि
प्रेम घ्यायला ह्या हृदयाला,
देता आलं तर माय दे !
बसं, इंतकं दान दे !

कवी:दिनेश राठोड(जिजाईसुत)
मो. नं.7391939846

१३ ऑगस्ट २०१८

जगाचं चित्र


८. जगाचं चित्र
""""""""""""""""""""""""
एकदा जगाचं चित्र काढताना,
त्यात रेखाटलं,
मनमोहक हिरवा निसर्ग,
अन् भक्कास दिसणारा वाळवंट.

पशु पक्षी ही दाखवले,
तुटक - मुटक दोन- तीन,
कारण, मला खोटं चित्र नव्हतं काढायचं,
मांडायच होत भयाण वास्तव,
पारदर्शी........

रस्ता तसा अरुंद दाखवलं,
पण, रस्त्यावर वासनेने भरलेल्या नजरा,
अन् उमलत्या खुरडणाऱ्या कळ्या,
जीवनाचं गाठोडं सुरळीतपणे चालवण्याकरीता,
देह विक्री करणाऱ्या आया -  बाया..
न जमले दाखवता- रेखाटता.....

रेखाटले सेलिब्रिटी चे ही  चेहरे,
नव्हे नव्हे तर त्यांच्या बालकांचे सुद्धा.
पण कुपोषणाने आजन्म मरणारे,
बालकांचे चित्र ही....
न जमले दाखवता- रेखाटता.....

भ्रषटाचारात मळलेले हात, दर्शविताना,
पेन्सिल सहज फिरवली,
पण सामान्य माणूस आजही,
पृथ्वीभोवती गोलच फिरतोय अजूनही...
हे दर्शवायच राहूनच गेलं,
ती प प्रत्येकाची सवयच आहे म्हणा.

चित्र तसा खूपच सुंदर दिसत होता.
लाखोत पेंटिग विकली गेली.
पान भरेपर्यंत दाखवली,
माणसांची गर्दी.......
पण माणसातली माणुसकी,
काही दिसलीच नाही.

आजतागायत खोटा पसारा,
खुप किमतीत विकल्या,
वास्तव मात्र आजही, अजुनही...
कवडीमोल आहे ...
अजाण आहोत....
माणसातल्या माणूसकीप्रमाणे.....


कवी: दिनेश राठोड

आयुष्याचं चित्रं...


  "आयुष्याचं चित्र "
""""""""""""""""""""""""""""""""
बाप मुलाचं आयुष्याचं चित्र रंगवतांना,
स्वत:च चित्र मात्र,न रंगवलेलं,बिनरंगी !
जीर्ण झालेल्या निराधार व्रृक्षासम !

मुलाला लहानाचं मोठं करणं,
पालणं हलवता-हलवता वाढवणं अन शिकवणं,
शिकवता-शिकवता नोकरीच्या उंबरठयावर पोहचवणं!

मुलगा होतो मोठा,साहेब,अधिकारी,
मग झोपडीचं रुपांतर घेतात इमारती !
त्यात त्याचं मुलबाळ अन त्याची साथी !

शेवटी बापाला कष्टाचं मोबदला मिळतं काय !
इमारतीत न राहण्याचा अधिकार !
अन अंती व्रृध्दाश्रम हेच मग आधार!

 कवी: दिनेश राठोड

१२ ऑगस्ट २०१८

घर सोडतांना...


    घर सोडतांना...
"""""""""""""""""""""""""""
आई,  मी घर सोड़तानां,
तुझ्या डोळ्यातून पाणी निघायचं.
अन् बाबांच्या डोळ्यात तर,
जणू महासागर साठलेलं दिसायचं.

मला आठवतंय मी पाया पडताना,
तू माझ्या डोक्यावर हात ठेवायची.
खुप शिक मोठा साहेब बन,
असं तू डोळ्यातून मला सांगायची.

बाबाच्या डोळ्यातलं महासागर,
अन् आई तुझाही तो मायेचा पदर.
नकळत माझ्या मनात साठायच,
एकांतक्षणी माझंही मन खूप रडायचं.

मला पण आठवायच मग,
बाबांच्या डोळ्यातले पाणी,
उन्हा- तान्हात राबण्याची,
तुमची दर्दमय जीवन कहाणी.

आठवून आठवून मला पण,
शिकण्याची स्फूर्ती मिळायची.
पुस्तकामधल्या प्रत्येक चित्रात,
आई तुच मला दिसायची.

कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)

११ ऑगस्ट २०१८

मास्तर


""""" मास्तर """"""
"""""""'"'"""""""""""""""""""""
मास्तर,
तुमचा काळा फळा केव्हाच गेला हो.......
आता पांढरा आलायं पांढरा.....
आणि पोरांच्या आयुष्यात ,
या पांढऱ्या रंगानी "काळ" आणलयं,
बघा काळ...मास्तर....काळ......

या अवास्तवीं,आभासी दुनियेचा,
जाणं नाही करून दिलीत म्हणून.....
मास्तर,आजचं पोरगं बघा.......
गुंडगिरी,दहशतवादी,गुन्हेगारी,
नव्हे नव्हे तर बलात्कारी सुद्धा,
बनायला लागलीयं मास्तर.......
याला जबाबदार पोरगं नाही मास्तर,
तुम्हीच आहात...हो तुम्हीच.......

मी पंतप्रधान,राष्ट्रपती,
आणि धनपती झालो तर....!
अशा काल्पनिक जगात नका जगवू,
वास्तवांशी नाळ जुळवा मास्तर.....

कारण,आज आमचं पोरगं,
१००%गुण मिळवून ही.....
सुशिक्षित बेरोजगार झालाय मास्तर.....
म्हणून सांगावसं वाटतं मास्तर,
"आजच्या पोरांना माणसांवर नाही.
माणसातलं शिकवा मास्तर.....
माणसातलं".......

केवळ कागदी परीक्षेत,
पास होण्याकरिता नाही,
"जीवनाच्या परिक्षेत"
पास झाला पाहिजे मास्तर......
" जीवनाच्या परिक्षेत"......

कवी: दिनेश जवरीलाल राठोड (जिजाईसुत)
मो. नं.7391939846

चारोळ्या... प्रेमाच्या...





चारोळ्या मनातल्या.....






आठवण


      आठवण ....
"""""""""""'"""""""""""
भावना माझ्या मनातल्या,
तुला  कसे कळले  नाही.
सागराच्या  मिलनासाठी,
सरिता का  वाहत राही?

साद   देत  हृदयाला,
तू मिचकावलेस डोळा.
तुला दिलेल्या प्रेमपत्राचा,
केलेस तू चोळामोळा.

तुटलेल्या चांदण्याकडून,
मी तुला मागितलं होतं.
पण त्या बिचाऱ्यालाही,
चांदणीसमोर झुरायचं होतं.

भावना माझ्या हृदयाच्या,
नच जमले तुला सांगता.
खरंच कधीच न जमले,
प्रेम चित्रात रंग भरता.

प्रेमाच्या  या  समुद्रात ,
कधी न जमले मला पोहता.
येते आता तुझी आठवण,
तू दिलेल्या भेटवस्तू बघता.

****-- कवी दिनेश राठोड --****
  मो. नं. 7391939846

बालपण


     बालपण
"""""""""""""""""""""
नसे सदा जीवाला कष्ट,
आनंदाच्या लहरी फक्त.
नाही मनाला कोंदण.
असे होते ते बालपण.

होतो जेव्हा मी तान्हा ,
माय पाझरे अमृताचा पान्हा.
त्या अमृताची लागते तहान,
असे होते ते बालपण.

पुरले ते चित्र बालपणाचे,
अन् संपले दिवस लाढाचे.
राहिल्या केवळ आठवण,
असे होते ते बालपण.

नव्हते कशाचे बंधन,
मनसोक्त ते जीवन.
देवा! एकच दे वरदान,
मिळो पुन्हा ते बालपण.

कवी दिनेश राठोड

म्हातारपण


 म्हातारपण
""""""""""""""'"""'"'"'
आयुष्याची खरी यातना
असह्य जगण्याच्या वेदना.
आठवतंय ते  बालपण ,
नकोय वाटतं हे म्हातारपण.

बोट धरून ज्यांना,
चालायला शिकवलं.
त्यांनीच अर्ध्या वाटेवरी,
बोट सोडूनी दिलं.

वाटेवरच्या वाटसरूचीही,
अशीच काहीशी कथा.
राहून ,. न  राहूनही,
वर्णवू लागले आपली व्यथा.

वाटेवरच्या चिमण्यांची ,
तीच चिव- चिव किलबिलाट.
पुन्हा पुन्हा सांगू लागले मज,
अरे! तुझा कोणी नाही या जगात.

त्या वाटेवरी रडलो- पडलो,
अन् पुन्हा स्वतः ला सावरलो.
आता असह्य वाटतंय हे जीवन,
देवा! आयुष्यात नको रे हे म्हातारपण.

कवी दिनेश राठोड

पुतळा कविता

११. पुतळा
""""""""""""""""""""'
माझ्या 'बा' ने घामाचे पाणी केले.
भुईच्या कुशीत बि- बियाणे पेरले.
मेघराजाही बरसला सरीवर सरी,
रान हिरवेगार झाले शेता शिवारी.

माय आणे रानात चटणी भाकर,
भाकरीवर लावी आंब्याचा खार.
पोरं फिरती रानोरानी उडती पाखरं,
चाले असा आमचा गरिबीचा संसार.

शेतात  राबता  राबता,
सरली  आमची  हयात.
अंत  नको पाहू  देवा  !
दे रे आमच्या उमिदीला साथ

गरिबीचे भेग नशिबी आले.
जगणं आमच कष्टात च गेले.
किती सोसू चटके, दुःखाच्या झळा,
सुख नाही नशिबी, भेगाळली धरा.

भेगळलेल्या  मातीमधी,
"बा" नं घामाच पाणी झिरपल.
एवढं समदं करुनी शेवटी,
माझं "बा" च सपान हरपलं.



शेतामधल्या   झाडावरी,
दुरूनच एक पुतळा हसला.
जवळ येऊनी  बघतो तर,
माझा"बा" फासात दिसला.

कवी जिजाईसुत