०८ जुलै २०२१

कविते...


कविते...


कविते...

हल्ली कसं 

सगळं सगळं

बदलत चाललंय..

निसर्ग, पशू, पक्षी, प्राणी, सजीव, निर्जीव.. 


आणि 

माणसं सुद्धा...


कविते....

भीती वाटू लागलीय

माझीच मला..

होऊ नये.. 

प्रवास माझा,

सजिवांकडून निर्जीवांकडे...


कारण,

दगडाला पाझर हल्ली 

फुटत नाही..

प्लास्टिकच्या 

फुलातून सुगंध दरवळत नाही..


©® जिजाईसुत



२ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Right poem👍 vichar chan

Mayuri khanvilkar म्हणाले...

जबरदस्त.... तुझा काव्याचा प्रवास निरंतर चालू दे😊