०३ जून २०२१

खेड्यानं आत्महत्या करू नये...

  ▪️ खेड्यानं आत्महत्या करू नये...

__________________________

शहरीकरणाच्या ओझ्याखाली,
कित्येक खेडी गुदमरताना पाहतोय,
स्वतःचं अस्तित्व संपू नये म्हणून...
शेवटी,
खेड्यानं आत्महत्या करू नये... 
म्हणजे झालं.

खेड्यानं, नव्या ऊर्मीने ऊभं रहायलाच हवं.
नव्या कल्पना सोबत घेऊन...

शहर स्वतःच्या धावपळीतून,
एक निवांत क्षण अनुभवण्यासाठी,
खेड्यात कसं धावत येईल...

यासाठी खेड्यानं स्वतःला 
रोज नव्या ऊर्जेची अनुभूती घेत. 
हवंहवंसं बनलंच पाहिजे....

▪️▪️

©️®️ दिनेश राठोड (जिजाईसुत)
        चाळीसगाव (जळगांव)

_____________________________________



२ टिप्पण्या:

Dhanashree Parab म्हणाले...

👌👌👌

Soham Deshpande म्हणाले...

सत्य परिस्थिती चा आढावा घेतलंय एकदम मस्त