२० मे २०२०

जिंदगी

जिंदगी...
_______________

जिंदगी,
तू असण्याचा सवाल करू,
की बवाल करू,
समजत नाहीय ही द्वंद अवस्था..

कामगाराचा पोरगाही बघतोय.
स्वप्न खूप मोठं होण्याचं..
पण चुलीवरचा चंद्र सांगून जातो..
सकाळची संपली...
आता संध्याकाळची बघ..

असं करत - करत..
कष्टाच्या पाण्यात,
स्वप्नाचं मीठ कधी विरघळून जाते
समजतही नाही..

नाही तर... आयुष्या..
तुला जिंकून...
तो ही मोठा साहेब झाला असता रे..

पण मजुरीच्या गंधानं
अन्  कष्टाच्या घामानं
मळलेल्या फाटक्या शर्टच्या भोकातून...
स्वप्नांची कस्तुरी कधीच दिसलीच नाही रे..
_____________________                         
©® जिजाईसुत

३ टिप्पण्या:

विलास पाटील म्हणाले...

खुवच समर्पक शब्दात व्यथा मांडलीस, दिनेश तू खरंच ग्रेट आहेस💐

DINESH DABHADE म्हणाले...

छान

Unknown म्हणाले...

Nice bro ek no ❤️❤️❤️