२३ मे २०२०

जिंदगी

जिंदगी...

जिंदगी...
तुझ्या असण्याने आनंदाचा गारवा नक्की असतो.
मात्र अनेकदा मनात दुःखाच्या लाटा उसळून येतात.
आशेचं निराशीकरण होताना...
मानवी मनाचं जागतिकीकरण होताना...
नकारात्मकतेची बाजू नक्कीच जड होते.
हृदाच्या कप्याला एवढी भोकं पडतात की,
नंतर भोकं पाडायला तुला सुध्दा जागा नसते.
आयुष्या...
सावर रे एकदा...
"जगावं की मरावं" हा प्रश्न
पडण्याआधी...
_______________
©® जिजाईसुत
__________________

२० मे २०२०

जिंदगी

जिंदगी...
_______________

जिंदगी,
तू असण्याचा सवाल करू,
की बवाल करू,
समजत नाहीय ही द्वंद अवस्था..

कामगाराचा पोरगाही बघतोय.
स्वप्न खूप मोठं होण्याचं..
पण चुलीवरचा चंद्र सांगून जातो..
सकाळची संपली...
आता संध्याकाळची बघ..

असं करत - करत..
कष्टाच्या पाण्यात,
स्वप्नाचं मीठ कधी विरघळून जाते
समजतही नाही..

नाही तर... आयुष्या..
तुला जिंकून...
तो ही मोठा साहेब झाला असता रे..

पण मजुरीच्या गंधानं
अन्  कष्टाच्या घामानं
मळलेल्या फाटक्या शर्टच्या भोकातून...
स्वप्नांची कस्तुरी कधीच दिसलीच नाही रे..
_____________________                         
©® जिजाईसुत

१८ मे २०२०

पर्यावरण शॉर्ट फिल्म

◼️ पिगमेंट एस.पी. प्रोडक्शन ◼️
             ●_आयोजित_●
◻️ YouTube Short Film Festival- 2020◻️

Second prize winner Short Film
● Short clip Creation present ●

#पर्यावरण (तुमचं,माझं,कोणाचं?)

                 ● लेखक- दिनेश राठोड
● दिग्दर्शक/आवाज/संकलन- निलेश गढरी
                 ● पोस्टर- सागर पोतदार

🎬 Short clip Creation Team, Mumbai 🎭

१६ मे २०२०

कविता

_____________________________________

कविता
_______________
शब्दांवर
बलात्कार करून
लिहीत नाही मी
कविता,

प्रेम करतो प्रत्येक अक्षरांशी
तेव्हा कुठे लिहिली जाते
एक कविता.

 ©® जिजाईसुत

_____________________________________

०३ मे २०२०

आपलंपण

आपलंपण
________________

जगाचा पोशिंदा
आभाळाकडे पाहत असतो.
पाऊस येईल या इच्छेवर..
अगदी तसंच
निवडणुकीच्या कालावधीत
फक्त काही महिने
तळमळत असतो नेता
निवडणुकीच्या ढगाकडे पाहत
विजयाचं पाऊस पडेल या आशेवर...

मतदानाच्या आदल्या काळया रात्री,
काळया पैशातून काळी कामे होतात.
बाटल्या तुटतात-फुटतात, 
निवडून येतात..
काळरात्र संपून दिवस उजाडतो.
अंगात पांढरा सदरा दिसतो..
मग पांढऱ्या सदऱ्यातून
काळा पैसा पांढरा दिसू लागतो.

निवडून आल्यावर,
दिसत नाही ते घर नि दार
ती आम जनता..
निवडणुकीच्या काळात
जेथे टेकवत होते माथा..

चढते मग त्यांना मस्ती
दिसते मग जनता सस्ती
जाळतात रातोरात वस्ती
दिवसात तेच बनतात हस्ती.

कृत्रिम पाप घडवून आणतात.
जाळायला लावणारे ते,
जाळणारे आपले..
जळणारेही आपलेच..
आता तुम्हीच सांगा
असंच किती दिवस जळत राहणार...
आता आपणच जागुया..
आपल्यातील आपलंपण शोधुया..
__________________________
©️®️ दिनेश राठोड (जिजाईसुत)
dineshjrathod1998@gmail.com
◼️◼️
_______________________________________