३० एप्रिल २०२०

मी

सये,तुझ्या सुखासाठी दु:खास कवटाळले मी,
हवे होते गुलाब पण काट्यास स्वीकारले मी.

तू म्हणालीस- माझ्याविना तू सुखी आहेस,
तेव्हा भर पावसात दुष्काळ अनुभवले मी.

विसरलो मी पण हृदयाने तुला जपून ठेवले,
कैकदा माझ्याच हृदयाला गद्दार समजले मी.

अखेरचा निरोप दिलेस तू आपल्या नात्याला,
तेव्हा माझ्या हृदयामधी विरहाचे बी पेरले मी.

कशी करू आता मशागत माझ्या हृदयाची,
धमन्या,शिरा अन् रक्त तुला कधीच विकले मी

©️®️ दिनेश जवरीलाल राठोड
           चाळीसगाव (जळगांव)
dineshjrathod1998@gmail.com
◾◾

________________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: