पडलेली भिंत असो की नात्यात हरलेला माणूस... दोघानाही नव्याने उभं करायला/राहायला वेळ लागतोच.
आयुष्यात काहीच नाही केलं तरी चालेल मात्र कोणालाही चिट करु नका, विश्वासघात करू नका. हे वाक्य तुम्हीही वाचलेले असणार नाही तर मग कुठेतरी ऐकलेले असणार.
खरं तर थोडं या वाक्याच्या आत डोकावून बघितल्यावर कळतं की, *विश्वासाच्या पायावरच नात्याची भिंत असते.* ज्या घराचा पाया डगमगत असेल, पतझड होण्याच्या मार्गावर असेल तर मग कितीही धडपड केलं तरी एक दिवस घर नक्की कोसळणार. हाच नियम नात्यात विश्वासाला सुद्धा लागू होतोच मित्रा... म्हणून नात्यात विश्वासाचा पाया भक्कम मजबूत असायला हवं...
विश्वासघात केल्यावर तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यातून वजा तर होतातच मात्र तुमच्यामुळे ती व्यक्ती दगड म्हणून जगत असते. भावनेचा चुरा झालेला असतो. कोणावरही विश्वास ठेवायला ती व्यक्ती घाबरायला लागते. आणि म्हणून त्या व्यक्तीच्या आयुष्यात जरी कोणी चांगली व्यक्ती आली तरी ती व्यक्ती भित भित जपून एक एक पाऊल ठेवत असते. कारण तुमच्यामुळे ती व्यक्ती सहज कोणालाही जवळ करत नाही. त्याने अनुभवलेलं असतं की, आपले कधी परके होतील सांगता येत नाही, कितीही जपलं तरी आपल्यासारखी विश्वासाला जागणारी सर्वच माणसे नसतात.
म्हणून नात्याची भिंत उभारताना विश्वासाचं पाया मजबूतच असायला हवं. नाही तर भिंती बांधण्या आधीच भेसळ ओळखून घ्या.
कारण, पडलेली भिंत असो की नात्यात हरलेला माणूस... दोघानाही नव्याने उभं करायला/राहायला वेळ लागतोच की...
- दिनेश राठोड
२१ जानेवारी २०२३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा