०७ मार्च २०२०

अब NO रेप


▪▪
 अब No रेप

अनेकदा मनाला मारून मारून,
खूप सोसल्या असह्य वेदना.
लिंग पिसाट झालेल्या माणसांची,
खूप झेलल्या क्रूर वासना...
संस्काराचा लावूनी लेप
आता बोलूया अब नो रेप...

महापुरुषांच्या विचारांची होळी करुनी,
वासनेच्या नजरेने करताहेत बलात्कार.
कालही आजही जन्मापासून तर मृत्यूपर्यंत,
उमलणाऱ्या कळ्यांवर होताहेत अत्याचार.
आता  स्वाभिमानाचा लावूनी लेप
आता  बोलूया अब नो रेप...

लेकी,कराटे बॉक्सिंग शिकून आता,
स्वाभिमानाचा झेंडा आपण रोवू.
नारी नव्हे अबला,ती आहे सबला,
साऱ्या जगास संदेश हा देऊ.
आता सुविचाराचा लावूनी लेप
आता बोलूया अब नो रेप...


सावित्रीचा इतिहास आमचा,
झाशीसम आता लढायचं.
खूपदा पडलो, डगमगलो,
पण आता शेवटी जिंकायचं.
आता संघर्षाचा लावूनी लेप
आता  बोलूया अब नो रेप...

©️ दिनेश जवरीलाल राठोड
      चाळीसगाव (जळगांव)
dineshjrathod1998@gmail.com

▪▪

_____________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: