१८ मार्च २०२०

मायक्रोस्कोप

◾◾
    ▪️  मायक्रोस्कोप ▪️

गावाला रजेचा अर्ज देऊन,
शहरात प्रवेश घेतलाय खरा..
पण...
निव्वळ माणसांची गर्दी,
फेरीवाल्यांची रेलचेल...
अन् लोकलची थैमान बघून...

मुंबई लोकलला चालवते की,
लोकल मुंबईला....
हा प्रश्न निरंतर पडत असतो..
असंख्य विचार गुदमरून...

अविरतपणे चालत असतो हा प्रवास..
एका ठिकाणाहून दुसरीकडे..
राग, दुःख, आनंद, क्लेश, भीती,
विविध रंगछटांनी..
वाहत असतो माणूस..
अबे-तुबे करत आपलेच ओझे..
लोकलच्या अंथरूणावर...
आपलेच विचार पांघरूण...

वर वर बिल्डिंगा दिसत असल्या जरी,
तरी आत झोपडीविना जगणाऱ्या...
घराविना रस्त्यावर नशीब आजमावणाऱ्या..
पाहत असतो मी आपल्याच माणसांची तगमग..

पण अजूनही गवसलंच नाहीय....
जगून मरणाऱ्या अन् मरून जगणाऱ्या,
माणसांच्या प्रयोगामधून,
शहरात जगण्याचा खरा अनुमान,
काढत असतो मी,
माझ्याच मायक्रोस्कोपमधून...

©️®️ दिनेश जवरीलाल राठोड
           चाळीसगाव (जळगांव)
dineshjrathod1998@gmail.com
◾◾
________________________________________



कोरोना

कोरोना   

असा कसा हा कोरोना,
चीनमधून भारतात आला.
चीनसमवेत सर्व देशाचा,
बघा! खुलेआम गेम झाला..

कोणी दवाखान्यात आहे
कोणी ढसाढसा रडत आहे.
कोणी तपासणीस आहे.
कोणी तडफडत मरत आहे.

सगळं सुरळीत चालत असताना,
अचानक हा आघात झाला.
अनुभवतोय कोरोनामुळे का होईना,
माणसातला माणूस जागा झाला.

सारे मरणाच्या भीतीने,
खेड्याकडे पळत आहे.
स्वच्छता किती महत्त्वाची!
कळत होतं आता वळत आहे.

शाळा, कॉलेज, मंदिर, सिनेमागृह,
बघा ना आता सारेच झालेय बंद.
माणसा-माणसा जाग आता तरी,
पर्यावरण अन् स्वच्छतेचा लाव छंद.

चीनमुळे कोरोना व्हायरसने,
जरी केलाय आपला घात.
एड्स, स्वाईन-फ्ल्यू सम
यांच्यावरही करू आपण मात.

डगमगू नका, घाबरु नका.
उगाचच बाहेर पडू नका.
मास्क घाला, स्वच्छता पाळा.
खात्रीने सांगतोय-
कोरोनालाही बसेल आळा.


©️®️  दिनेश जवरीलाल राठोड
         चाळीसगाव (जळगांव)
dineshjrathod1998@gmail.com
________________________________________

०७ मार्च २०२०

अब NO रेप


▪▪
 अब No रेप

अनेकदा मनाला मारून मारून,
खूप सोसल्या असह्य वेदना.
लिंग पिसाट झालेल्या माणसांची,
खूप झेलल्या क्रूर वासना...
संस्काराचा लावूनी लेप
आता बोलूया अब नो रेप...

महापुरुषांच्या विचारांची होळी करुनी,
वासनेच्या नजरेने करताहेत बलात्कार.
कालही आजही जन्मापासून तर मृत्यूपर्यंत,
उमलणाऱ्या कळ्यांवर होताहेत अत्याचार.
आता  स्वाभिमानाचा लावूनी लेप
आता  बोलूया अब नो रेप...

लेकी,कराटे बॉक्सिंग शिकून आता,
स्वाभिमानाचा झेंडा आपण रोवू.
नारी नव्हे अबला,ती आहे सबला,
साऱ्या जगास संदेश हा देऊ.
आता सुविचाराचा लावूनी लेप
आता बोलूया अब नो रेप...


सावित्रीचा इतिहास आमचा,
झाशीसम आता लढायचं.
खूपदा पडलो, डगमगलो,
पण आता शेवटी जिंकायचं.
आता संघर्षाचा लावूनी लेप
आता  बोलूया अब नो रेप...

©️ दिनेश जवरीलाल राठोड
      चाळीसगाव (जळगांव)
dineshjrathod1998@gmail.com

▪▪

_____________________________________