मरूनही जगेन मी...
झुकलो असेन मी नात्यासाठी,
पण कधीच गद्दार झालो नाही,
शोषितांना प्रकाश देण्यासाठी,
मी कधीच अंधार झालो नाही.
माणसे जोडले माणुसकीसाठी,
स्वार्थात कधीच मी रमलो नाही.
होते ते आयुष्यास विझवण्यासाठी
पण मी स्वतः कधीच विझलो नाही.
जवळ केले अनेकांना आपुलकीसाठी,
स्वार्थासाठी माणसे कधी जोडलो नाही.
लढत गेलो स्वतःला जिंकवण्यासाठी,
दुसऱ्याशी कधीच बेईमानीने लढलो नाही.
आज आहे तो वर बोलून घ्या माझ्याशी..
उद्या नियतीच्या फासात असेन नसेनही मी.
कोणत्या वेळी घेईन मी निरोप तुमच्याशी..
रोजच तर मरतोय पण मरुनही जगेन मी..
©️®️ दिनेश राठोड (जिजाईसुत)
चाळीसगाव (जळगांव)
_____________________________________
झुकलो असेन मी नात्यासाठी,
पण कधीच गद्दार झालो नाही,
शोषितांना प्रकाश देण्यासाठी,
मी कधीच अंधार झालो नाही.
माणसे जोडले माणुसकीसाठी,
स्वार्थात कधीच मी रमलो नाही.
होते ते आयुष्यास विझवण्यासाठी
पण मी स्वतः कधीच विझलो नाही.
जवळ केले अनेकांना आपुलकीसाठी,
स्वार्थासाठी माणसे कधी जोडलो नाही.
लढत गेलो स्वतःला जिंकवण्यासाठी,
दुसऱ्याशी कधीच बेईमानीने लढलो नाही.
आज आहे तो वर बोलून घ्या माझ्याशी..
उद्या नियतीच्या फासात असेन नसेनही मी.
कोणत्या वेळी घेईन मी निरोप तुमच्याशी..
रोजच तर मरतोय पण मरुनही जगेन मी..
©️®️ दिनेश राठोड (जिजाईसुत)
चाळीसगाव (जळगांव)
_____________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा