जात
करू नकोस प्रेम आपल्यात कात आहे
बघ ना तुझी-माझी वेगळीच जात आहे.
गरिबास पाहून डोळ्यात अश्रू येत नाही,
बघ तुझ्या-माझ्या नात्याचा रंग जात आहे.
जाता येता बघतात ते गोरी पाठ तुझी
बघ खुलेआम तुझी अब्रू जात आहे.
नकार दिल्यास तुझा छळ करेन म्हणतो,
बघ तो माणसातून जनावरात जात आहे.
जाग नारी तू सावित्री हो रणरागिणी हो ,
बघ ही माणसे तुला छळण्यास जात आहे.
रडू नको रे तू चिराग हो संविधाना !
बघ तुला जाळण्यास ते जात आहे.
तुझी जात माझी जात म्हणता म्हणता,
बघ भारतीय असल्यास पुरावा जात आहे.
©️®️ *दिनेश जवरीलाल राठोड*
चाळीसगाव (जळगांव)