१० सप्टेंबर २०१८

अलविदा


""अलविदा ""
""""""""""""""""""""""""
कोमेजलेल्या कळीसम,
मित्रांनी दिले निरोप मला.
मी ही स्तब्ध पाषाणसम,
बोललो,तुम्हालाही अलविदा.....

मैत्रीची रेशीम गाठ तुटली,
शाळेचे दिवस संपता .
हिच का निसर्गाची किमया !
ते म्हणाले,तुला अलविदा.....

रोखूनी हदयाचा ठोका,
मुखातून शब्द फुटेना.
तरी मित्र म्हणाले पुन्हा,
तुला आमचा अलविदा.....

माझे जीवन तेजोमय झाले,
तुमची साथ लाभता .
अश्रू लपवत सहज म्हणाले,
तुला आमचा अलविदा.....

बंद करुनी स्पंदने ,
मैत्रीचा डाव मोडणे.
सोपं नसतं प्रमेश्वरा.....
एकमेकांस देणे अलविदा....


©️कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)

०३ सप्टेंबर २०१८

माझा अंत


पुढच्या जन्मी


 पुढच्या जन्मी
"""""""'""""'"""""""""""
तुझ्याशी   बोलाया,
आलो तुझ्या जवळी.
बोललो मी तुझ्याशी,
उमलली मनातली कळी.

सांग   प्रिये सांग ना ,
जोडशील का नाती.
करशील का प्रेम माझ्याशी,
करतो मागणी प्रेमाची.

या पाषाणाला दे,
तू गं उत्तर.....
जगी पसरू दे,
आपल्या प्रेमाचं अत्तर.

तू काय उत्तर द्यावं !
अन् मी मुक्काच व्हावं.
या प्रेमाचं वाजेल का शंख?
या प्रेमाला फुटेल का पंख?

सांग ना पुढच्या जन्मी तरी,
प्रेमाला देशील का आकार.
प्रेम करशील का साकार.
निदान, पुढच्या जन्मी तरी.....


कवी: दिनेश राठोड (जिजाईसुत)

०२ सप्टेंबर २०१८

शाळेत आपण जाऊ या


शाळेत आपण जाऊ या!
""""""""""""""""""""""""
शाळा शिकायला या रे या!
सुंदर आहे , ही शाळा....//धृ//

या सगळे सर...सर...सर.....
शिकवा आम्हाला भर...भर...
आनंदाने शिकू या.....
शाळेत आपण जाऊ या...//१//

गुरुजींची कविता गाऊ या...
आनंदाने डोलू या......
गुरुजींची आज्ञा पाळू या...
शाळेत आपण जाऊ या.....//२//

शाळेत झाडे लावू या...
निसर्ग आपण फुळवूया...
विचार चांगले करू या...
शाळेत आपण जाऊ या...//३//

शिकून मोठे होऊ या...
ज्ञान आपले वाढवूया...
चांगले जीवन जगू या...
शाळेत आपण जाऊ या...//४//

कवी: दिनेश राठोड (जिजाईसुत)
चाळीसगाव (जळगांव)
मो नं.7391939846