एक जगा वेगळं नातं...
.... मैत्री .....
मैत्री.... व्वा..! किती छान संकल्पना मैत्रीचा अर्थ अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर...'मैं ' म्हणजे 'मी' आणि ' ती' म्हणजे ' तू'.. म्हणजेच ' आणि तू' किती सुंदर अर्थ आहे ना मैत्रीचा...!
एका दृष्टीने बघितलं तर मैत्री अनेक प्रकारची असू शकते. दाट मैत्री, वरवरची वा कामापूर्ती मैत्री. या सर्वांमधून आपल्याला खरी मैत्री ओळखायची असते. प्रत्येकाच्या आयुष्यात कळत नकळत जडणार नातं म्हणजे मैत्री..!
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. मैत्री शिवाय आणि समजाशिवाय राहणारा माणूस विरळाच! मानवी शरीरात हृदयाला जे स्थान आहे ना तेच स्थान जीवनात मैत्रीला आहे. कारण हृदय रक्त शुद्धीकरणाच महत्वाचं काम चोख बजावतो. अगदी तसच मैत्री मनातल्या अशुद्धीचे वेळोवेळी शुद्धीकरण करते. अशी ही मैत्री कधीही, कुठेही, कुणाशीही, कुठल्याही परिस्थितीत होते. तर कधी एकमेकांचा द्वेष करता करता मन मैत्रीच्या नात्यात गुंफल जातं. कळतही नाही. कारण...
"प्रेमळ अशा मैत्रीला,
वैराची जोड नसते.
पण वैरातून जन्मनाऱ्या मैत्रीला,
जगात कुठेही तोड नसते."
अशा द्वेषातून निर्माण होणाऱ्या मैत्रीत एकमेकांची काळजी घेताना बघितलं तर आश्चर्य वाटणारच. मैत्रीचे रोपटे भावी आयुष्यात वटवृक्ष कधी बनते. हे कळतच नाही.हा वटवृक्ष एकदा बहरला की, त्याची छाया इतरांनाही सुख देत राहते.मग ही मैत्री इतकी शिगेला पोहचते की, एकमेकांशिवाय बिलकुल राहवत नाही. जरा काही अडलं, जरा काही नवीन घडल की, लगेच एकमेकांना सांगितल्या शिवाय चैनच पडत नाही. आयुष्यातील प्रत्येक क्षणी या मैत्रीला स्थान असते.
"अगणित अशी संख्या,
तारका नंतर मित्रांचीच.
पण माझी मात्र मैत्री,
स्वतः नंतर तुझ्याशीच."
अस म्हणता म्हणता कधी एकमेकांवर हक्क दाखवायला सुरुवात होते. हे लक्षात येतं नाही.या मैत्रीला भावने बरोबर जर बुद्धीची जोड असेल तर विचारायलाच नको! बालपणाची मस्ती, तरूनपणाची किंवा पुढील आयुष्यात चुकून डोक्यात गेलेली मस्ती माज काढायला आवश्यकता भासते. ती या मैत्रीचीच! हक्कान रागवणारी, मायेनं समजूत घालणारी मैत्री मिळायला सुद्धा खुप चांगलं नशीब लागतं. कारण..
"मैत्री म्हणजे प्रश्नाला,
साजेस असणार उत्तर,
कितीही शिंपडल तरी,
जणू न संपणार अत्तर."
या साजऱ्या मैत्रीला अचानक कधी कधी कोणाची नजर लागते. मैत्रीच्या नाजूक रोपट्याला विश्वासाचे खतपाणी वेळोवेळी केले नाही तर गैरसमजुती चे चक्रीवादळ स्वतः बरोबर इतरांनाही फरफटत नेते.... नकळत....
मैत्री म्हणजे आयुष्याच्या प्रवासात ध्येयापर्यंत पोहचविणारी ' नाव ' असे म्हणतात. प्रवास तेव्हाच चांगला होतो, जेव्हा त्या नावेचा नावाडी चतुर कुशल असतो.जसे आपण आपल्या मैत्रीत हे गुण शोधतो तेच मित्रही अशी आशा बाळगत नसतील का? म्हणजेच मैत्रीचा यशस्वी प्रवास हा दोघांच्या चांगुलपणा, विश्वास, यावर अवलंबून असतो. चांगल्या मित्राची परीक्षा ही आयुष्यातील संकटाच्या वादळाप्रमाने असते...
"मैत्री म्हणजे नातं असं,
काही केल्या तुटत नाही.
जशी एकदा पडलेली गाठ,
सहजासहजी सुटत नाही.
मैत्री दिनाच्या सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा...
HAPPY FRIENDSHIP DAY..
©️®️ दिनेश राठोड
चाळीसगाव (जळगांव)
मो. नं. 7391939846