२८ सप्टेंबर २०१९

तिरंगा

◾◾
                         तिरंगा
गुरुजी म्हणाले-
मुलांनो,उद्या स्वातंत्र्य दिन आहे.
आज तिरंग्याचं चित्र काढूया का?
एका  सुरात मुलं म्हणाली
हो,गुरुजी... काढुयात....

कदम तू पांढरा कागद दे,
मॅक्स तू पेन्सिल दे,
रहीम तू केशरी रंग दे,
राम तू हिरवा रंग दे,
रायसिंह तू निळा दे,

गुरुजी चित्र काढू लागले,
वाटल्या जाणाऱ्या जाती
धर्माला एकत्र आणू लागले.

केशरी रंग रंगवता-रंगवता...
तोच कुंचला हिरव्या रंगात बुडवला
हिरवा रंग देता-देता....
तोच कुंचला निळ्या रंगात गेला.

अनेक दंगली घडल्या,
केशरी,हिरव्या,निळ्या रंगाच्या
गुरुजींनी,
दंगलीला एकात्मतेच्या पाण्याने धुतल्या,
शेवटी मानवतेचं चित्र..
तिरंगा तयार झाला....
▪️▪️
©️®️ दिनेश राठोड (जिजाईसुत)
                कन्नड (औरंगाबाद)
◾◾