१३ ऑगस्ट २०१९

साहेब...

साहेब...

साहेब, साहेब काय सांगू तुम्हाला,
पुरामध्ये काय काय संपून गेलं.
परिवारासमवेत सर्ज्या राज्याही,
आज  सारं सारं काही वाहून गेलं.

दुष्काळ दुष्काळ म्हणता–म्हणता,
निसर्गालाही याचा एवढा राग यावा.
अन् मायबापासमवेत सारं काही,
न कळवता संगतीला घेऊन जावा.

लढण्याचे शस्त्र गंजले अन् संपलेही,
आता जिंदगीशी सामना करू तरी कसा?
कराल तुम्ही मदत अन् द्याल पॅकेजही,
नियतीशी झुंजण्याचे सामर्थ्य आणू तरी कसा?

साहेब, थैमान घातलेल्या या पुरासमोर,
आमच्या पापणीतले पाणी दिसणार नाही.
आज आमची कथा ऐकून अंतरीच्या व्यथा,
तुमच्या दगडाच्या मनाला  समजणार नाही.

साहेब तुमच्या पॅकेजने पुन्हा माझे मायबाप अन्,
परिवाराचे ते सुखद प्रेम कधीच मिळणार नाही.
प्रतिष्ठेपायी तुम्ही कराल मदतही लाखो रुपयांची,
पण काळजातली वेदना तुम्हाला कळणार नाही.

©️✍️ दिनेश राठोड (जिजाईसुत)
         चाळीसगाव (जळगांव)
         मो. नं.9359360393