३० जून २०१९

वसंता...


वसंता...

वसंता,गोर बंजारा समाजेन,
तू केसुला सम बहरायो.
हामारो वसंता...रे तू...
समाजेन दिशा वतायो..

11 वर्ष मुख्यमंत्री पदेर,
तू इतिहास घडायो.
वसंता,सारी जगेम रे तू,
महानायक केरायो..

हरित क्रांती रो तूच प्रणेता,
तूच हेतो गोरुर जीवनदाता..
आज तारी जयंतीर दन
तारे चरणेम मेला छा माथा..

कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)


२५ जून २०१९

हत्या

   हत्या..

आज पुन्हा एकदा
कट्टर जातीवंताने केली हत्या
अप्रत्यक्षपणे....
तिचा अन् त्याचा,
खून केलाय खून....!

स्वतः ला
जातिवंत समजणाऱ्यानों,
कधी अमूर्त जाती धर्म सोडून,
त्याच्या पल्याडही जावून बघा..!
तेव्हा दिसेल एक जात,
माणुसकीची....!

मग अंगीकरा ही जात,
आणि बना कट्टर माणुसकीचे
जातिवंत उपासक..
आणि मग करा बिनधास्त खून,
माणुसकीने...!


©️®️ दिनेश राठोड (जिजाईसुत)

२३ जून २०१९

महापुरुष समजून घेतांना




महापुरुष समजून घेतांना...


नमस्कार...🙏🙏🙏

भावी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक सरपंच आणि राजकारणाच्या नशेत गुंग असलेली युवा पिढी....
तुम्हा सगळ्यांना मन:पूर्वक दंडवत....🙏🙏
लेख लिहिण्यास कारण असे की, सध्या पावसाची सुरुवात झालीय आणि हो त्यासम विविध जयंती पुण्यतिथि वर्षभर चालूच असते म्हना पण हल्ली तयारी मात्र जोरात...
महापुरुषांची जयंती, पुण्यतिथि आपण साजरी का करतो? याच उत्तर अनेकांना सांगता येईल. पण वेळप्रसंगी आपण अनुत्तरित राहतो..
इतिहासातील उदाहरण घेतले तर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले..
का केले असावे?
लोकांनी एकत्र यावे. गुण्यागोविंदाने एकत्र राहावे.
माणसांनी माणुसकीने राहावे. महापुरुषांचे विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोहचावे. हा मूळ उद्देश असावा.
पण आज आपण या जयंती आणि पुण्यतिथि ची काय अवस्था करून ठेवलीय.
आजच्या जयंती आणि पुण्यतिथि चे स्वरूप खूप भयावह आहे. नुसते विनाकारण पैसे खर्च करणे आणि महापुरुषांच्या नावाखाली स्वतः ची प्रसिध्दी मिळवणे, आणि एकमेकांच्या समाजाविरूध्द वरचढ निर्माण करणे हेच मूळ उद्देश आणि तत्व आपल्याला ठळकपणे दिसून येतो.
एकमेकांच्या समाजाविरुद्ध जयंती किंवा पुण्यतिथि निमित्त लोकांचे काय उदगार असतात बघा..
" त्या समाजातील लोकांनी शिवाजी महाराजांची, आंबेडकरांची, महाराणा प्रतापसिंह ची,संत सेवालाल महाराजांची जयंती - पुण्यतिथि काय जोरात साजरी केली..!"
आता आपण ही चांगलं नियोजन करून भरमसाठ खर्च करून त्यांच्याहीपेक्षा अतिशय चांगल्या प्रकारे साजरी करू..
एकंदरीत एकमेकांची चढाओढ आपल्याला दिसते..
अशा या सगळ्या कालखंडात युवावर्ग या सगळ्या गोष्टींत नशेत असतो..त्याला बेरोजगाराची जाणीव
होत नाही. या मध्ये युवकांचा नुसती वापर केला जातो. "महापुरुषांच्या कार्यक्रमात आम्हाला फक्त नाचणं शिकवलं वाचणं आम्ही विसरलो."
आम्ही वाचणं बंद केलं. काही अंशी कमी केलं. म्हणूनच आजपर्यंत आम्हाला खरे महापुरुष समजलेच नाही व समजत नाही. आम्ही महापुरुषांना ओळखतो फक्त त्याच्या फोटो पुरता...
आम्ही कधीच जाणून घेतलीच नाही आजची वास्तविकता..
महापुरुषांना आम्ही वाचत नाही म्हणून आज आपण महापुरुषांच्या कार्यक्रमाला फक्त शक्ती प्रदर्शन करणं शिकलो.मन प्रदर्शन आम्ही विसरलोच..
एकच उदाहण मांडतो की, ज्या महापुरुषांची जयंती/पुण्यतिथि साजरी करीत आहोत त्या  कार्यक्रमात कोणत्याही व्यक्तीला विचारा की, या या महापुरुषांचा जन्म कधी झाला? त्यांनी अस काय कार्य केलं की आपण त्याची जयंती साजरी करत आहोत. तो पुढचा व्यक्ती गोंधळात पडतो.त्याला त्या महापुरुषांचा जन्म कधी आणि कुठे झाला हे सांगता येत नाही.कार्य ही सांगता येत नाही. ही वास्तविकता आहे..
जवळ जवळ ६५% ही परिस्थिती आहे.असे दिसून येते.
यात अजून निवडणुकीचे दिवस असतील तर विचारूच नका.. स्वतः ला कशाची अक्कल नसते.
आणि महापुरुषांच्या कार्यक्रमाला माणसांपेक्षा बॅनर जास्त दिसतात..
बॅनर वर लहान लहान फोटो एवढे असतात की, ओळखू येत नाही की,हा कोणाचा फोटो आहे..
आणि त्यात एक मोठा फोटो असतो.. जणू महापुरुषांची जयंती नसून त्याचीच जयंती आहे.
त्याच्यासमोर भावी आमदार, खासदार, नगरसेवक, वगैरे वगैरे....
मुळातच जयंती पुण्यतिथी साजरी करण्याचा आमचा हेतू हा स्वच्छ नसतोच..
जर असता तर आम्ही विनाकारन बॅनर लावले नसते. विनाकारण पैसे वाया घातले नसते..
आम्हाला सर्वांगाने सुदृढ, वैचारिक, आदर्श समाज घडवायचा असेल तर आम्हाला बदलणं गरजेचं आहे.
महापुरुषांच्या कार्यक्रमाला महापुरुषांना जर खरी आदरांजली द्यायची असेल,त्याचा वारसा पुढे चालवायचा असेल तर त्याचा विचारांचा उपयोग आपण आचरणात केलाच पाहिजे..
त्याशिवाय पर्याय नाही रे भारतीय नागरीका...!
महापुरुषांच्या कार्यक्रमानिमित्त गोर गरीबांना,दीन दुबळ्यांना, अनाथ मुलांना, वृद्धाश्रमाना, उचाशिक्षित होऊ पाहणाऱ्या गरीब मुलांना, मदत केली पाहिजे. सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे..
आजही काही लोक महापुरुषांच्या कार्यक्रमाला अशा प्रकारचे उपक्रम राबवतात.अनेक गरिबांना मदतही करतात.पण हे प्रमाण खूपच कमी आहे..
हे प्रमाण आपल्याला वाढवायचा आहे...
तरच आम्ही महापुरुषांच्या विचार आचरणात आणून त्याच्या "पाऊलावर पाऊल ठेवून समाजहित जोपासू शकतो.."
स्वतः मनाशी एक प्रश्न नक्की विचारा की,
आम्ही महापुरुषांच्या पाऊलावर पाऊल ठेवत चालतो का.?
चालत आहोत का.?
महापुरुष समजून घेत आहोत का.?
जय भारत..! जय महाराष्ट्र....!! वंदे मातरम्...!!!

✒️ लेखक तथा साहित्यिक
✒️ दिनेश जवरीलाल राठोड
     चाळीसगाव (जळगाव)
📞 मो. नं. 7391939846
            9359360393

टिपः सदरील फोटो नमुना दाखल सहज दिलेला आहे.कोणीही आक्षेप घेऊ नये..