२५ नोव्हेंबर २०१८

माणुसकीचा रंग


माणुसकीचा रंग

विखुरलेल्या  माणसास,
एकतेची कास हवी.
माणसात माणूस पेरण्यास,
मज तुझी साथ हवी.

आता कोणतेच रंग न सोडले,
याच जातिवंत क्रूर माणसाने,
अनेकांच्या मनी मस्तकी पेरले,
निळे,हिरवे,भगवे,याच माणसाने.

अग सखे आज तू सांग गं ,
माणसास रंग देऊ कोणता!
मी कसं सांगू हो तुम्हाला?
येथे कोणताच रंग उरला !

माणसातल्या जातीच्या भिंतीला,
आता आपणच दोघेच रंगवूया.
सखे,माणसातल्या माणसाला,
आज माणुसकीचा रंग देऊया.
©️®️ कवी दिनेश राठोड (जिजाईसुत)
          मो. नं.7391939846

०६ नोव्हेंबर २०१८

तेजोमय



      तेजोमय


पहाटे सगळे साखर झोपेत
गोड स्वप्नात असतांना,
बाप साखर बनविण्यासाठी,
ऊसतोडीला निघायचा.
थोडा उशीर झाला तर,
बाप मध्येच घाई करायचा.

बाप सदा गाडी हाकताना,
बैलाला जोरात पळवायचा
बिचारा बैल ही बापासम,
सारं काही सहन करायचा.

माय करपलेल्या हातांनी,
चुल्हीवर भाकरी भाजायची.
घामासमवेत ऊसा-पाचटामधी,
भाकरीला चव न्यारीच असायची.

'बा'च्या आयुष्यात कसला दसरा,
अन् कसली आली दिवाळी,
आजन्म त्यांच्या नशिबांची रे,
पाटी आजही आहे काळी.

दिवाळीला बाप झोपडी बाहेर पडताना,
त्याला लख- लख प्रकाश दिसायचा.
तेव्हा ते सारं- सारं काही पाहून ,
बापाच्या मनात काळोख दाटायचा.

बापाच्या मनात दाटलेला काळोख,
आता मला नाहीसा करायचाय.
त्यांच्या हृदयात विझलेल्या दिव्याला,
पुन्हा तेजोमय करायचय.

©️®️ कवी: दिनेश राठोड (जिजाईसुत)
             मो नं. 7391939846